Description
मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. प्रतिभावान मुलांची जडणघडण करणे हे शिक्षक आणि पालकांचे राष्ट्रकार्य आहे. प्रत्येक मुलात एक बौद्धिक क्षमता असतेच. त्या क्षमतेला ओळखून, त्याला नीट प्रज्वलित करण्याचे काम पालक आणि शिक्षकांना करावयाचे असते.
मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या कौशल्याने सोडवून त्यांना प्रोत्साहित करणे कौशल्याचे काम आहे. मुलांकडून चुका झाल्या की, त्या पुन्हा होऊ नये हे त्यांना समजावून सांगणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे याची जागरूक पालक काळजी घेतात. मुलांची बौद्धिक प्रगती जितकी महत्त्वाची आहे, त्याबरोबरच व्यावहारिक जगात वावरण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे, असे संस्कार प्रतिभावान मुलं घडविताना शिक्षक आणि पालक करत असतात.
————————————————————————————————————————-
आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. पालक जिंकण्यासाठी धावत सुटले आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.
कामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीसाठी गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी ‘मूल्यं’ या सर्वांचा हा प्रवास आहे.
आपण पालक मुलांना कधी ही पाच वाक्यं लक्षात ठेवून सांगतो का?
त् माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
त् माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे.
त् तू हे किती छान केलंस.
तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं.
सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं.
पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! तेव्हा पालकांनो, मुलांसाठी सारं काही करताना सोबतच हेही करा.
Reviews
There are no reviews yet.