fbpx

Shaley Vidyarthyansathi IIT ani Medical Foundation | शालेय विद्यार्थ्यांसाठी आयआयआटी आणि मेडिकल फाउंडेशन

₹200

184Pages
AUTHOR :- R. C. Joshi
ISBN :- 9789352202362

Share On :

Description

आज प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार संस्थांमधूनच शिक्षण पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. परिणामी या संस्थांच्या प्रवेश परीक्षांकरिता हे विद्यार्थी अगदी जिद्दीनं अभ्यास करीत आहेत. साहजिकच शालेय स्तरावरील म्हणजेच ८ वी ते १० वी गणित व विज्ञानाचा फाउंडेशन कोर्स आणि एनटीएसईच्या माध्यमातून त्याची तयारी करण्यास विद्यार्थी प्राधान्य देत आहेत.
अर्थात दहावीपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांचे पुढचे करिअर निश्चित नसते. म्हणूनच त्यांना आयआयटी, एम्स, विज्ञान शाखेत शिक्षण व संशोधन, यूपीएससी, सीए असे असंख्य मार्ग खुले असावेत या दृष्टिकोनातून फाउंडेशन कोर्स आणि एनटीएसईची एकत्र तयारी करून घेण्यावर भर दिला जात आहे. किंबहुना अशी तयारी करून घेणाऱ्या क्लासेसकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा असतो.
या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रज्ञावंत विद्यार्थ्याला आणि त्यांच्या जागरूक पालकांना या कोर्सेससंदर्भात इत्थंभूत माहिती मिळेल अशी खात्री आहे.

 

Additional information

About Author

लेखकाचा परिचय
प्रा.डॉ. आर.सी. जोशी
० अध्यापनकार्याचा ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव.
० औरंगाबाद येथील सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून सदतीस वर्षांच्या रसायनशास्त्र विषयाच्या अध्यापनानंतर सेवानिवृत्त.
० पदव्युत्तर शिक्षणाकरिता मराठवाडा विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयाची शिष्यवृत्ती आणि पीएच.डी. साठी संशोधन अनुदान.
० सेंद्रिय रसायनशास्त्रातील (Organic Chemistry) काही उपयुक्त संयुगांचे (Compounds) संशोधन. याच विषयात पीएच. डी. व संशोधन मार्गदर्शक.
० दैनिके आणि नियतकालिकांत मराठीतून विपुल लेखन.
० ललित वाङ्मय प्रकारातील तेरा पुस्तकांचे लेखक. त्यातील काही पुस्तकांचा इतर भाषांत अनुवाद.
० महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोशातील 'विज्ञान व तंत्रज्ञान’ विभागासाठी अभ्यागत संपादक (Visiting Editor) म्हणून कार्य.
० महाराष्ट्र राज्य शासनाच्या 'ऑपरेशन ब्लॅक बोर्ड' योजनेअंतर्गत शिक्षकांसाठी निवड झालेल्या ‘शैक्षणिक साहित्याची कहाणी' या पुस्तकाचे लेखक.
० ‘विज्ञान प्रदर्शन' या पुस्तकास प्रा.वि.गो. कुलकर्णी, संचालक होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई यांचा पुरस्कार (प्रस्तावना).
० ‘विज्ञान मित्र' या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रौढ शिक्षण संस्थेचा साहित्य पुरस्कार.
० 'बहुरूपी बहुगुणी कार्बन' या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा 'उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार'.
० महाराष्ट्र राज्याच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या ‘विज्ञान मंच’ उपक्रमाचे औरंगाबाद जिल्ह्यासाठी समन्वयक.
० आकाशवाणी औरंगाबाद केंद्रासाठी सल्लागार समितीचे सदस्य.
० राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने 'बालचित्रवाणी’करिता निमंत्रित लेखक.
० ‘मराठवाडा विज्ञान विकासमंच' या संस्थेचे प्रवर्तक व मार्गदर्शक.
० लायन्स क्लब, औरंगाबाद यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
० महाविद्यालयीन आणि शालेय विज्ञानदर्शनेयांच्या (Science Exhibits) स्पर्धेतील काही बक्षीसप्राप्त विज्ञानदर्शनेयांचे (Science Exhibits) मार्गदर्शक. ० शासकीय तसेच इतर अनेक विज्ञान प्रदर्शनांकरिता निमंत्रित परीक्षक. मराठवाडा विद्यापीठाच्या दशवार्षिक विज्ञान संमेलनातील विज्ञान प्रदर्शनात आणि आकाशवाणीच्या राज्य पातळीवरील विज्ञान संमेलनात आणि त्यातील विज्ञान प्रदर्शनात महत्त्वाचा सहभाग.
० विज्ञान प्रदर्शन उपक्रमासाठी विपुल मार्गदर्शन आणि लेखन.
० पदवी आणि पदव्युत्तर अध्यापनाबरोबर ११ वी व १२ वीतील विद्यार्थ्यांना आयआयटी आणि एम्सच्या प्रवेश परीक्षांकरिता तसेच शालेय विद्यार्थ्यांना एनटीएसईकरिता सातत्याने मार्गदर्शन.
० राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील एनटीएसई शिबिरातील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन.
० एनटीएसई शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी एनटीएसई परीक्षेत संपूर्ण भारतात सर्वप्रथम तर दोन विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम.
० आयआयटी आणि एम्सच्या प्रवेश परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची निवड. त्यातील अनेकांना या परीक्षांमध्ये उच्च रँक्स.
० शालेय स्तरापासूनच जर फाउंडेशन सुरू केले तर पुढे आयआयटी आणि एम्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल याच उद्देशाने ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी व मेडिकल फाउंडेशन आणि त्याचबरोबर एनटीएसईच्या एकत्रित तयारीसाठी गेली पंधरा वर्षे अध्यापन.
० अनेक संस्था, महाविद्यालये, शाळा आणि कोचिंग क्लासेसमधून नियमित व्याख्याने. याच अध्यापन आणि मार्गदर्शनातून 'शालेय विद्यार्थ्यांसाठी आयआयटी आणि मेडिकल फाउंडेशन' या प्रस्तुत पुस्तकाची निर्मिती.
० सरांनी घडवलेले असंख्य विद्यार्थी सध्या भारत, इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह इतर अनेक देशांत उच्चपदांवर कार्यरत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shaley Vidyarthyansathi IIT ani Medical Foundation | शालेय विद्यार्थ्यांसाठी आयआयआटी आणि मेडिकल फाउंडेशन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat