Sukshmjantu | सूक्ष्मजंतू

₹290

352 Pages

AUTHOR :- Achyut Godbole
ISBN :-9789352202980

Share On :

Description

सूक्ष्मजंतू’या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंड आहे.
तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे.
जीवाणू तसेच विषाणूंचा शोध, रोगजंतूंचे थैमान आणि त्यांचा मानवी इतिहास व संस्कृतीवर उमटलेला अमीट ठसा, याबद्दल अतिशय रसाळ भाषेतून वाचकांशी संवाद साधतानाच हे पुस्तक आपल्याला उपकारक सूक्ष्मजंतू आणि माणूस यांच्यामधल्या जनुकीय नात्याची सहज सुंदर ओळख करून देते.
हे पुस्तक शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व वाचकांना अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे.
डॉ. जगन्नाथ सातव,
निवृत्त सायंटिफिक ऑफिसर, बीएआरसी, मुंबई
सूक्ष्मजीवसृष्टीची उत्पत्तीपासूनची समग्र गाथा ओघवत्या सहज शैलीतून विस्तारानं उलगडताना सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी लिहिलेलं ‘सूक्ष्मजंतू’ हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं. इतकंच नव्हे तर प्रायॉन्स, बॅक्टेरिओफेजेस आणि अलीकडे सापडलेले महाकाय विषाणू अशा नवनवीन शोधांची रंजक सफर घडवतं. केवळ शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे तर सर्व मराठी वाचकप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे.
डॉ. राजीव ढेरे,
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे

सिद्धहस्त लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांचं ‘सूक्ष्मजंतू’ हे सर्वसामान्य वाचकालादेखील समजेल अशा सहज सोप्या शैलीमधून साकार झालेलं अतिशय सुंदर पुस्तक आहे. सूक्ष्मजंतूंचा इतिहास, विज्ञान आणि मानवी संस्कृतीवर पडलेला प्रभाव यांचा धांडोळा घेताना लेखकद्वयींनी अतिशय परिश्रम घेऊन प्राचीन काळापासून ते 21व्या शतकापर्यंतच्या जंतुविज्ञानाचा सखोल आढावा घेतला आहे. साथीच्या रोगांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्मजंतूंचा वेध घेणार्या, त्यावर लस शोधून काढणार्या शास्त्रज्ञांच्या चरित्रकथांनी नटलेलं हे पुस्तक वाचकाला गोष्टीचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतं.
डॉ. वेदवती गुरुराज पुराणिक,
माजी वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे

ओघवती सुगम भाषा, वैज्ञानिक संकल्पनांची, संशोधनाची केलेली अतिशय लक्षवेधी मांडणी आणि गोष्टीवेल्हाळ रूपानं केलेलं वैज्ञानिक कथन यांच्या मिलाफातून ‘सूक्ष्मजंतू’ हे देखणं पुस्तक साकार झालं आहे. या पुस्तकात सूक्ष्मजंतूंच्या अन्वेषणाच्या जोडीला संशोधनासाठी वापरलेल्या छोट्या छोट्या बारकाव्यांचं केलेलं रसाळ वर्णन लेखकांच्या ज्ञानाच्या उत्तुंगतेबद्दल खूप काही सांगून जाते. ‘तो मी नव्हेच’, ‘आपले आरोग्य आपल्या पोटात!’ ही प्रकरणे वाचकांना खिळवून ठेवणारी, नवी माहिती देणारी आहेत.
डॉ. सौ. वर्षा परशरामी,
माजी वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे

Additional information

About Author

अच्युत गोडबोले शालान्त परीक्षेत राज्यात 16 वा; कॉलेजमध्ये, विद्यापीठात पहिला क्रमांक. पहिली ते आय.आय.टी.पर्यंत गणितात जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं. आय.आय.टी. मुंबईचे केमिकल इंजिनिअर, 1972. सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत 32 वर्षं अनुभव; त्यातली 23 वर्षं हजारो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स असलेल्या जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत सर्वोच्च पदाचा अनुभव. सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त 150 हून जास्त वेळा जगप्रवास. पटणी, सिंटेल, एल.अॅण्ड टी. इन्फोटेक, अपार, दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांच्या जगभरातील व्यवसायात अनेक पटीनं वाढीमध्ये हातभार. टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरल्या जाणार्या कॉम्प्युटरवरच्या ‘ऑपरेटिंग सिस्टिम्स’, ‘डेटा कम्युनिकेशन्स अँड नेटवर्क्स’, ‘वेब टेक्नॉलॉजीज्’ आणि ‘डिमिस्टिफाइंग कम्प्युटर्स’ या चार प्रत्येकी 500 ते 700 पानी पाठ्यपुस्तकांचं लेखन. चिनीसकट अनेक भाषांत ही पुस्तकं अनुवादित. मराठीत 42 पुस्तकांचं लेखन ः ‘संगणकयुग’, ‘बोर्डरूम’, ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, ‘गुलाम’, ‘थैमान चंगळवादाचे’, ‘नॅनोदय’ , ‘स्टीव्ह जॉब्ज’, ‘मनात’ , ‘मुसाफिर’(आत्मचरित्र), ‘गणिती’, ‘झपूर्झा 1-2-3’ , ‘कॅनव्हास’, ‘लाईमलाईट’, ‘जीनियस 1-2-3’, ‘मनकल्लोळ भाग 1 आणि 2’ ‘रक्त’, ‘सिंफनी’, ‘व्हिटॅमिन्स’, ‘बखर संगणकाची’, ‘संवाद’, ‘अनर्थ’, ‘माय लॉर्ड’, ‘शरीर’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘इंडस्ट्री 4.0’, ‘ऑटिझम’, ‘सजीव’, ‘प्रवास’, ‘प्रकाश’, ‘इन्फोटेक’. ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, ‘नॅनोदय’, ‘मनात’ आणि ‘अनर्थ’ या पुस्तकांना राज्यशासनासह अनेक मानाचे पुरस्कार. ‘तंत्रमंत्र’, ‘प्राणिजगत’, ‘वैद्यकायन’, ‘विज्ञानवाद’ आणि ‘इन्फोटेक’ अशा अनेक वाचकप्रिय लेखमाला; वर्तमानपत्रांत आणि मासिकांत मिळून एकूण 1000 च्या वर लेख. टेलिव्हिजन आणि यू ट्यूब या माध्यमांवर ‘अर्थशास्त्र’, ‘मानसशास्त्र’, ‘विज्ञान’, ‘तंत्रज्ञान’, ‘गणित’, ‘विवेकवाद’, ‘उद्याचं जग’, ‘माझं लेखन/माझी मुसाफिरी’, आणि ‘संगीत’ यांच्याविषयी अनेक भाषणं आणि चर्चांमध्ये सहभाग आणि मुलाखती. आय.बी.एम.तर्फे दोनदा पुरस्कार आणि पंतप्रधानांकडून दोनदा पुरस्कार, ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, आय.आय.टी.चा प्रचंड बहुमानाचा ‘डिस्टिंग्विश्ड अॅल्युमिनस’ पुरस्कार, पं. भीमसेन जोशींच्या हस्ते ‘कुमार गंधर्व’ पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा ‘नवरत्न’ पुरस्कार, ‘डॉ. पारनेरकर’ पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘सोनोपंत दांडेकर’ पुरस्कार, तसंच ए.आय.टी. कडून, सोलापूर विद्यापीठाकडून, उत्तुंग परिवाराकडून असे एकूण 5 वेळा ‘जीवनगुणगौरव’ पुरस्कार, ‘लाभसेटवार’ पुरस्कार, ‘इंद्रधनू’ पुरस्कार, ‘पद्माकर देव स्मृतिगौरव’ पुरस्कार, ‘न. चिं. केळकर’ पुरस्कार. ‘समाजशिक्षक’ पुरस्कार, ‘जनकल्याण’ पुरस्कार, ‘मनकल्लोळ’ या पुस्तकासाठी साहित्यपरिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार. अच्युत गोडबोले यांच्या लिखाणावर तीन जणांची Ph.D. सुरू. ‘TEDeX’ या प्रचंड प्रतिष्ठेच्या भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान. अमेरिकेच्या 2015 मधल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (BMM) लॉस एंजेलिस, 2017 मध्ये लंडन, तर 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया इथे झालेल्या संमेलनाचे प्रमुख अतिथी. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘युवा साहित्य-नाट्य संमेलना’चे अध्यक्ष. ‘आशियाना’ नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा चालू करण्यात पुढाकार. आय.आय.टी. नंतर भिल्ल आदिवासी चळवळीत सहभाग. सध्या ‘सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चे मॅनेजिंग डायरेक्टर.   डॉ. वैदेही लिमये बायोकेमिस्ट्री या विषयात मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट, 1998. लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज (सायन हॉस्पिटल) आणि बी.ए.आर.सी. इथे संशोधन. संशोधनासाठी बाँबे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरकडून आर.डी. बिर्ला स्कॉलरशिप. मुंबई विद्यापीठाच्या रामनारायण रुईया कॉलेज, वझे केळकर कॉलेज, मिठीबाई कॉलेज, के.ई.एम. हॉस्पिटल इथे बी.एस्सी. आणि एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्री, फूड सायन्स, बायोअॅनॅलिटिकल आणि बायोइनऑर्गॅनिक केमिस्ट्री, क्लिनिकल रिसर्च, बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल मायक्रोबायॉलॉजी या विषयांसाठी तसंच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा इथे एम.फार्म. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना फार्माकॉलॉजी, क्लिनिकल रिसर्च आणि फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी या विषयांसाठी लेक्चरर म्हणून एकूण 15 वर्षांचा अनुभव. 2015 पासून हॅनोव्हर युनिव्हर्सिटी, जर्मनी इथे मेडिकल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागात क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रसिद्ध. बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल रिसर्च, एपिडेमीऑलॉजी आणि बायोएथिक्स या संबंधित अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग. मराठी साहित्य आणि संगीत यांचा अभ्यास. प्रकाशित पुस्तके -‘रक्त’ 2017) ‘व्हिटॅमिन्स’ (2018)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sukshmjantu | सूक्ष्मजंतू”

Your email address will not be published. Required fields are marked *