Description
‘‘सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट.
मग खाली तपशील होता
गेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला.
स्फोटाची तीक्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत.
पोलीस अधिक तपास करीत आहेत.’’
श्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यातलीच ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? ती का घडली असावी? त्याचे नेमके कारण काय? तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.
Reviews
There are no reviews yet.