Tee Dogha | ती दोघं

₹200

184Pages
AUTHOR :- Rama Marathe
ISBN :- 9788177867565

Share On :

Description

ती दोघं!
वेगवेगळ्या स्वभावांची… वेगवेगळ्या काळातील…
नातं एकच – पती-पत्नी, नर-मादी, प्रियकर-प्रेयसीचं !
पण भावबंध अनेकविध !
कधी यौवनाचं, सौंदर्याचं आकर्षण
कधी तिचं विशाल आईपण
कधी त्याच्या मनाचं मोठेपण
कधी त्याचं फक्त व्यवहारी मन
कधी दोघाचं एकमेकांत विरघळून जाणं
कधी एकमेकांना पुरतं ओळखून असणं
कधी त्रिकोण प्रेमाचा, कधी खेळ दुर्दैवाचा
कधी न संपणारं रितेपण, तर कधी जगावेगळं समर्पण
कधी प्रेमाला झालर मनमोकळेपणाची
कधी किनार काळी, संशयाची, प्रतारणेची
कधी ती दोघं फक्त समांतर रेषा,
कधी शब्दावरण फक्त डोळ्यांचीच भाषा
कधी ओढ फक्त शरीराची – भोगवादी
कधी ती दोघं फक्त नर आणि मादी…
क्वचित इतर कोणतंही नातं इतकं विविधरंगी असेल…
हे नातं व्यक्त करणारी भाषा काळानुरूप, संदर्भ आणि प्रसंग त्या त्या
वेगळ्या सामाजिक संकेतानुसार!
पण ‘भावना’ त्याच… आदिम!
एकविसाव्या शतकात वावरणार्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचे अर्थच धूसर झाले आहेत.
भारतीय परंपरांचे, संस्कृतीचे काठ लेवून वाहणारा हा कथांचा ओघ कदाचित हे नातं समजून घेण्यासाठी मन सुस्नात करील…

Additional information

About Author

डॉ. रमा मराठे
M.D.M.B.A., M.Sc. Ph.D. (Psychology)
डॉ. रमा मराठे विख्यात डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका आणि कवयित्री आहेत,
त्यांनी लिहिलेल्या 'औषधाविना आरोग्य' व 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' या पुस्तकांची केंद्र सरकारच्या 'भारतीय भाषा संस्थान', म्हैसूरद्वारा भारतभर वितरणासाठी निवड करण्यात आली.
भारतातील अनेक शहरांत मानसशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सुगमरीतीने स्पष्ट करणारी व्याख्याने व कार्यशाळा त्या घेत असतात.
त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम व मुलाखती झाल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच कथाकथनाचे व स्वरचित काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.
विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीतर्फे विद्यार्थी, पालक, शिक्षक, उद्योजक, इंडस्ट्रीज या सर्वांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून समुपदेशन, व्याख्याने आणि कार्यशाळा; तसेच वैयक्तिक मानसशास्त्रीय चाचण्या, करिअर व व्यक्तिमत्त्वविकास याविषयी डॉ. रमा मराठे मार्गदर्शन करतात.
email: drmaethel@gmail.com, drmarthel@rediffmail.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tee Dogha | ती दोघं”

Your email address will not be published. Required fields are marked *