Description
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना १९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले.
टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतीवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे…
आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योम्य दिशा कोणती व का हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत.
– म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१
रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९०
ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९०
साहित्य अकादमी पुरस्कार १९९१
Reviews
There are no reviews yet.