The Art Of Letting Go | द आर्ट ऑफ लेटिंग गो

₹225

168 Pages
AUTHOR :- Damon Zahariades
ISBN :- 9789352203833

Share On :

Description

नकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
राग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?
असं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.

‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:

लोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)
नकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?
आपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?
सोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)

Additional information

About Author

आपली निर्मितीक्षमता कशी वाढवावी, वेळेचे नियोजन कसे करावे आणि या प्रवासात तुम्हाला अधिक सुखकारक व आनंददायी जीवनशैली कशी निर्माण करावी हे अॅमेझॉनचे बेस्ट सेलिंग लेखक डेमन झहारियाज तुम्हाला टप्प्याटप्प्याने आणि कृतिप्रवण सल्ला देऊन शिकवतील. त्यांची मार्गदर्शनपर पुस्तकं वेगवान मांडणी आणि तत्काळ उपयोगात आणता येतील असे कृतिशील सल्ले यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या पुस्तकातून वाचकांना अधिक चांगल्या, सकारात्मक जीवनशैलीचा आनंद मिळाला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Art Of Letting Go | द आर्ट ऑफ लेटिंग गो”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat