Description
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे.
तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे.
अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
————————————————————————————————————————-
सदर पुस्तकामध्ये अनेक व्यवसायांतील व विविध क्षेत्रांतील ज्यांच्या यशोगाथा सर्वांना ज्ञात आहेत, अशा महान आणि दिग्गज व्यक्तींच्या यशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विजयी माणूस कसा घडतो? हा प्रश्न ज्या महान माणसाने प्रथम विचारला, तो म्हणजे नेपोलियन हिल. हा जगातल्या दिग्विजयी माणसांच्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
यशस्वितेचे प्रसिद्ध मंत्र सांगणाऱ्या या शिक्षकाने स्वत:चे नशीब आणि आयुष्यातल्या अपार कष्टांचा फार मोठा भाग ‘यशस्वितेच्या नियमांचे’ तत्त्वज्ञान तयार करण्यासाठी खर्च केला.
हे सगळं साध्य करण्यासाठी त्याने जगातील यशस्वी माणसांच्या गळ्यात विजयाची माळ घालणाऱ्या त्यांच्या विशिष्ट श्रद्धा व त्यांचे कर्तृत्व यांचा शोध घेतला.
नेपोलियन हिल यांनी यशस्वितेच्या एवं गुणविशिष्ट अशा १७ तत्त्वांचा शोध लावून, त्या तत्त्वांविषयी सखोल आणि तपशीलवार लिखाण केले.
यशस्वितेचं चैतन्यमयी प्रकाश देणारं हे लिखाण त्यांनी नंतर संक्षिप्त स्वरूपात आणलं; जेणेकरून ज्यांना जागृत होऊन विजयी व्हायचंच आहे त्यांना ते सहज हाताला लागेल. त्याचा परिणाम म्हणजे यशस्वितेकडे नेणारी जादूई शिडी.
Reviews
There are no reviews yet.