Description
थॉमस अल्वा एडिसन जगातील सर्वश्रेष्ठ संशोधक होते. आयुष्यात जन्मापासून शारीरिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वच बाजूने नकार असताना स्वत:ला कसे घडवावे याचा उत्कृष्ट वस्तुपाठ म्हणून एडिसन यांच्या जीवनाकडे पाहता येते. एका कानाने वीस टक्के ऐकू येत असताना तारायंत्र, फोनोग्राफ, मायक्रोफोन, सिनेमा इ. सारख्या ध्वनीसंबंधी यंत्रांचा यशस्वीपणे शोध लावला. विजेच्या दिव्याच्या बल्ब क्रांतिकारक शोधामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. पहिल्या महायुद्धाच्या काळात संरक्षण विभागासाठी अनेक यशस्वी प्रयोग केले. एडिसन यांना हजारोंच्यावर पेटंट मिळाले होते. त्यासाठीच त्यांना मेनलो पार्क चा जादूगार’ म्हटले गेले. संशोधनासाठी वाहून घेतलेल्या एडिसन यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी पारदर्शक होती. त्यामुळेच त्यांच्या चरित्राचा व कर्तुत्वाचा परिचय होणे, ही कोणत्याही काळाची गरज आहे. या असामान्य कुशाग्र बुद्धिमत्तेच्या संशोधकाचे हलवून सोडणारे चरित्र ठरेल.
Reviews
There are no reviews yet.