Description
त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड?
दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती.
कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे.
या देशातील गोरगरिबांचे, दीनदलितांचे रक्षणकर्ते आणि समाजातील घातक रूढी परंपरांना विरोध करून त्या मोडणारे कर्ते समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव सर्वांनाच माहीत आहे. शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि स्त्रीशिक्षणाची देशात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही काम केले आहे.
सत्यशोधक समाजाची स्थापना करणाऱ्या महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. मुलांवर चांगले मूल्यसंस्कार करण्यासाठी महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांच्या माध्यमातून त्यांचे चरित्र इथे मांडले आहे.
मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच त्यांचे इतिहास आणि भूगोलाचे सामान्य ज्ञान अगदी सहज वाढविणारे हे पुस्तक विद्यार्थी वाचकांच्या बरोबरीनेच शिक्षक आणि पालक यांच्यासाठीही उपयुक्त आहे.









Reviews
There are no reviews yet.