Description
सी यू अॅट द टॉप लिहिण्यापासून पुढच्या २० वर्षांच्या काळात झिग झिग्लर हे यशोशिखरावर पोहोचले, तेव्हापासून त्यांनी ‘यशोशिखरावर’ या विक्रमी खपाच्या पुस्तकातील माहितीची उजळणी केली आणि ती अद्ययावत केली. हे पुस्तक त्यांच्या व्यवसायातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे त्यामुळे त्यांनी ते अधिक यशस्वी होण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी तयार केले आहे.
झिग्लर अचूकपणे ओळखतात आणि दाखवून देतात की, संपूर्ण आयुष्यात लोकांना जे हवे असते ते कसे मिळवावे- आनंदी, निरोगी, रास्तपणे समृद्ध आणि सुरक्षित राहण्यासाठी आणि मित्र, मनाची शांती, चांगले नातेसंबंध आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आशा टिकवण्यासाठी.
यशोशिखरावर हे पुस्तक तुम्हाला सवोत्कृष्ट बनण्याच्या आणि तुमच्याजवळ जे आहे ते ओळखून विकसित करत राहण्याच्या जबाबदारीची खात्री करून देईल.
झिग झिग्लर हे झिग झिग्लर संस्थेचे अध्यक्ष आहेत, जे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या संसाधने पूर्णपणे वापरात आणण्यासाठी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतात. झिग्लर हे अमेरिकेतील महत्त्वाचे प्रेरणादायी वक्ते आहेत. सर्व प्रकारच्या श्रोत्यांना विनोदबुद्धी, आशा आणि उत्साह देण्यासाठी ते संपूर्ण जग फिरत असतात.
त्यांनी अमेरिकेतील सर्वांत महत्वाच्या व्यक्तीसोबत मंचावर व्याख्यान दिले आहे. जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश, रोनॉल्ड रेगन आणि गेराल्ड फोर्ड यासोबतच पॉल हार्वे, डॉ. रॉबर्ट शुलर, जनरल कोलिन पॉवेल आणि इतर अनेक.
Reviews
There are no reviews yet.