Leadershipche Rahasya | लीडरशिपचे रहस्य

₹200

216Pages
AUTHOR :- John C. Maxwell
ISBN :- 9788177868616

Share On :

Description

जॉन सी. मॅक्सवेल हे अमेरिकेच्या नेतृत्व या विषयातील तज्ज्ञ आहेत.
ते व्यक्तिगतरीत्या हजारो आणि लाखो व्यक्तींना प्रत्येक वर्षी मार्गदर्शन करतात.
त्यांनी त्यांचे नेतृत्वाचे तत्त्व फॉर्च्युन ५०० कंपनी,
द युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकॅडमी, वेस्ट पॉइंट आणि एन.सी.ए.ए., एन.बी.ए. आणि एन.एफ.एल. येथील सहकाऱ्यांसमोर मांडले आहे.
मॅक्सवेल हे काही संस्थांचे संस्थापक आहेत, ज्यामध्ये मॅक्झिमम इम्पॅक्ट याचा समावेश आहे.
जे लोकांना त्यांच्या नेतृत्व सामर्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्यास समर्पित आहे.

ते चाळीसपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये डेव्हलपिंग द लीडर विदिन यू, युवर रोड मॅप फॉर सक्सेस,
विनिंग विथ पीपल आणि द २१ इर्रिफ्युटेबल लॉज ऑफ लीडरशिप यांचा समावेश आहे, ज्यांच्या एक दशलक्षापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
जॉन सी. मॅक्सवेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या.
www.maximumimpact.com

नेतृत्वाची योग्य व्याख्या
“नेतृत्व ही एक प्रभावी बाब आहे. बस इतकेच, यापेक्षा जास्त काहीही नाही आणि कमीही नाही… जो कोणी असा विचार करतो की तो नेतृत्व करू शकतो; पण त्याचे अनुसरण कोणी करत नाही, तो केवळ (फिरण्यासाठी) चालत असतो.”

नेतृत्वाचा विशेष गुण
“जे ‘जन्मतःच’ नेतृत्व गुण घेऊन आले आहेत, त्या विशिष्ट समूहासाठीच नेतृत्व मर्यादित नाही. नेतृत्वाचा विशेष गुण म्हणजे नेतृत्वाची मूळ स्थिती होय, जी प्राप्त केली जाऊ शकते. तुमच्या इच्छा आणि गुणांना एकत्रित करा आणि मग उत्कृष्ट नेता बनण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही.

कार्य व्यवस्थापन आणि नेतृत्वामधील फरक
“इतरांनी काम पूर्ण केले की नाही याची खात्री करून घेणे हे व्यवस्थापकाचे कार्य असते आणि इतरांना उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरित करणे, हे नेत्याचे कार्य असते.”

Click To Chat