fbpx

Ravatencha Pachhadlela Wada | रावतेंचा पछाडलेला वाडा

₹200

152 Pages

AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 9789352202843

Share On :

Description

मोठमोठ्या वाड्यांबद्दल सर्वांना एक प्रकारचं आकर्षण वाटत असतं. त्याच्या गूढवलयाचं निराकरण हवं असतं अन् हा वाडा तर पेशवेकालीन…! काय काय घटना घडल्या असतील त्यावेळी वाड्यात…? तेथे वावरणारी कित्येक माणसं – त्यांचे हेवेदावे – सलोखा की सूडवैर – अन् त्यांचे आत्मे – अजून असतील का वावरत – तेथेच – त्यांना मुक्ती मिळेल…? स्थळ आणि त्या स्थळाशी संबंधित असलेली माणसं एकत्रित आल्यावर काय होतं, काय घडतं, याची प्रचीती त्यांना येत होती. त्यांची उपपत्ती तर्कावर आधारित होती. ती आतापर्यंत पुराव्यानं सिद्ध झाली नव्हती. त्यांच्या तर्काला कसलाही शास्त्रीय आधार नव्हता. पुराव्यानं सिद्ध करण्याची त्यांना संधीपण मी नव्हती. रावते यांच्या वाड्यानं ती अनपेक्षितपणे मी होती. पुन्हा अशी संधी मिळेल याची शाश्वती नव्हती. “आपण वाड्यामध्ये जातोय; पण तिथं काही विपरीत घडलं तर..?”.

Additional information

About Author

भयकथांचा अनभिषिक्त सम्राट: नारायण गोपाळ धारप जन्म: २७ ऑगस्ट १९२५ शिक्षण: रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ) कार्यक्षेत्र: मराठी साहित्यिक साहित्य प्रकार: कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा मृत्यू: १८ ऑगस्ट २००८ पुणे धारपांविषयी थोडेसे: व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबऱ्यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले 'समर्थ' हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या 'अनोळखी दिशा' या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. २०११ मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्याचबरोबर त्यांच्या एका कथेवर आधारित असलेली 'ग्रहण' ही मालिकाही खूप गाजली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी २०१८ मध्ये 'तुंबाड' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ravatencha Pachhadlela Wada | रावतेंचा पछाडलेला वाडा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat