fbpx

Career Mantra | करिअर मंत्र

₹250

216 Pages

AUTHOR :- Jeevan Muley
ISBN :- ‎9789352203475

Share On :

Description

सुयोग्य करिअर निवडणं… प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य टप्पा…
अगदी बालवर्गात पाऊल ठेवल्यापासून नकळतपणे आपल्या करिअरची पायाभरणी सुरू असते. दहावी-बारावीच्या निर्णायक वळणावर आपल्याला आपली नेमकी दिशा ठरवावी लागते आणि त्या क्षणी सर्वांत महत्त्वाचे असते ते विवेकी मार्गदर्शन. कारण करिअरच्या पायावरच आपल्या यशस्वी जीवनाची इमारत उभी असते.
हेच मार्गदर्शन करत असंख्य वाटांमधून स्वतःची वाट शोधण्यासाठी आपली मानसिक बैठक घडवणारे आणि त्या अनुषंगाने या प्रदीर्घ पण आवश्यक अशा प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक. प्रत्येकाची आवडनिवड, कुवत, संधी इत्यादी अनेकविध पैलू असलेला करिअरचा विषय यात सविस्तरपणे मांडला आहेच; पण त्याबरोबरच शैक्षणिक अर्हता मिळवल्यानंतर मुलाखतीमध्ये स्वतःचा ठसा उमटवत नोकरी किंवा व्यावसायिक जगामध्ये कसे पदार्पण करावे हेही इथे मुद्देसूदपणे सांगितले आहे.
करिअरचा शोध घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, शिक्षण मिळवल्यानंतर व्यावसायिक जगतात पाऊल ठेवू पाहणाऱ्या असंख्य नवतरुणांना आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकवर्गाला हे पुस्तक निश्चितपणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

Additional information

About Author

प्रा. जीवन मुळे
अध्यापनाचा ३५ वर्षांचा अनुभव असलेले प्रा. जीवन मुळे उत्तम वक्ते असून त्यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योजक, प्रशासक यांच्यासाठी अनेक प्रशिक्षणवर्ग, चर्चासत्रं, कार्यशाळा कार्यान्वित केल्या आहेत.
प्रा. मुळे यांची विविध विषयांवर १० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्यातर्फे बेस्ट पॉलिटेक्निक टीचर ऑफ महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड हे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे उद्योजकता विकास, प्रशासकीय कौशल्य व विकास, करिअर विकास इत्यादी विषयांवर अनेक लेख वर्तमानपत्रं, मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Career Mantra | करिअर मंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat