fbpx

Share Bazar | Multibagger Stocks

₹380

408 Pages
AUTHOR :- Indrazith Shantharaj | Prasenjit Paul
ISBN :- 935220896X

Share On :

Description

तुमची आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी स्टॉक्सचा वापर प्रभावीपणे करा.

भारतातले लोकप्रिय लेखक इंद्रजिथ शांथराज यांच्या ‘हाउ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग’ या पुस्तकातून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करायची आणि त्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे याची उत्तम माहिती समजते. सोप्या भाषेत सांगायचे, तर या शेअर बाजारातल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचे, अमलात आणता येतील असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचबरोबर, आधी सर्व माहिती मिळवून मग ट्रेडिंगसंबंधी निर्णय घेण्यासाठी कोणती धोरणे उपयुक्त ठरतील, हेही या पुस्तकात सांगितलेले आहे.

बाजारातले ट्रेंड ओळखण्यापासून तांत्रिक इंडिकेटरचे विश्लेषण करण्यापर्यंत या पुस्तकात यशस्वीपणे ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि तंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत.
प्रत्यक्ष उदाहरणे आणि त्यावरचे विश्लेषकांचे मत यात लिहिल्यामुळे, शेअर बाजाराच्या क्षणभरही उसंत नसलेल्या जगामध्ये वावरण्याची मानसिकता कशी विकसित करायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त कशी बाणवायची हेही या पुस्तकातून तुम्हाला समजेल. शिवाय, भांडवल कसे वाचवून ठेवायचे, त्याच त्या चुका परतपरत कशा करायच्या नाहीत आणि सतत शिकत राहणे कसे अनिवार्य आहे, हेही हे पुस्तक तुम्हाला दाखवून देईल.
तुम्ही नवशिके असाल किंवा अनुभवी ट्रेडर अथवा गुंतवणूकदार असाल तरीही तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी, तुमची आर्थिक स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला निश्चितच मदत होईल.

इंद्रजिथ शांथराज हे २०१६ पासून पूर्णवेळ इंट्राडे ऑप्शन्स ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत. स्टॉक मार्केटसंबंधी अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अल्गॉरिदम ट्रेडिंग आणि स्वतःच्या विकसित केलेल्या पद्धती असे दोन्ही वापरून ते ट्रेडिंग करतात.त्यापूर्वी, बारा वर्षेमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

तुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते. मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.

अत्यंत लोकप्रिय लेखक आणि यशस्वी गुंतवणूकदार प्रसेनजित पॉल यांनी मागील दहा वर्षांत स्वत:च्या पोर्टफोलिओची 100 पटींपेक्षा अधिक वाढ केली आहे. मल्टिबॅगर गुंतवणूक कशी करावी, याची उपयुक्त माहिती त्यांनी या पुस्तकात सांगितलेली आहे. स्वत:च्या संपत्तीची निर्मिती कशी केली, याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि कोणालाही अमलात आणता येईल अशा धोरणाची आखणीही केलेली आहे.

प्रचंड मोठा परतावा देणारे स्टॉक्स शोधून काढायचे एक साधे; पण अत्यंत प्रभावी असे तंत्र वाचकांसाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे. गुंतवणूक कधी करावी (बाजारात प्रवेश कधी करावा), किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी आणि बाजारातून पूर्ण गुंतवणूक कधी काढून घ्यावी? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिशय महत्त्वाच्या या तीन प्रश्नांची उत्तरे सदर पुस्तकात दिलेली आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Share Bazar | Multibagger Stocks”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat