The Code Breaker | Walter Isaacson | Book In Marathi Books | द कोड ब्रेकर | वॉल्टर आयझॅक्सन | Jennifer Doudna, Gene Editing And The Future Of The Human Race

Share On :

Description

लिओनार्डो दा विन्ची आणि स्टीव्ह जॉब्ज यांचा चरित्रकार परत एकदा लेखणी उचलतो–
२०१२ साली, नोबेल पुरस्कारविजेती संशोधक जेनिफर डोडना ही एका संशोधनाने प्रकाश झोतात आली. हे संशोधन मानवी प्रजातीचे भवितव्य बदलू शकते. हे सशोधन सहजपणे डीएनएचे जनुकसंपादन करू शकणारे एक साधन आहे. त्याचे नाव क्रिस्पर. या संशोधनाने एका धाडसी, नव्या जगाची द्वारे खुली केली. याच्या साहाय्याने वैद्यकशास्त्रात चमत्कार घडवणे शक्य होईल. मात्र अनेक नैतिक समस्याही पुढ्यात उभ्या ठाकतील. या तंत्राचा उपयोग करून काही जीवघेणे आजार बरे करता आले, फायझर कंपनीच्या लसीमुळे कोरोनाशी समर्थ मुकाबला करता आला आणि गर्भावस्थेतील शिशुमध्ये वारशाने पुढे जातील असे बदल करण्यात आले.
पण याचा मानवतेशी कसा सबंध जोडता येतो? रोग होऊच नये म्हणून आपण आपल्या डीएनएमध्ये बदल करावेत का? या तंत्राचे लोकशाहीकरण करून आपले वारस अधिक गुणवान करायची संधी पालकाना द्यावी का?
क्रिस्पर या तंत्राचा शोध लागल्यावर डोडना अशा अनेक प्रश्नांशी झगडते आहे. ‘द कोड ब्रेकर’ ही चरित्रवजा गाथा लिहून वॉल्टर आयड्रॉक्सन यानी सर्वज्ञात असे जीवन कसे बदलत जाणार आहे याचे विवेचन केले आहे. एका बुद्धिमान स्त्रीच्या चरित्रातून ते आपल्यासमोर जणू त्याचे शब्दचित्रच उभे करतात

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Code Breaker | Walter Isaacson | Book In Marathi Books | द कोड ब्रेकर | वॉल्टर आयझॅक्सन | Jennifer Doudna, Gene Editing And The Future Of The Human Race”

Your email address will not be published. Required fields are marked *