Description
वडार जमातीतील सर्वच माणसे प्रचंड अंगमेहनत करणारी आहेत. जमिनीतील उत्तम प्रतीचा दगड बाहेर काढून भारतमातेच्या मंदिराचा पाया या समाजातील लोकांनी मजबूत केला. मोठमोठे वाडे, घरे, किल्ले यांना दगड पुरविण्याचे आणि बांधकामाचे अशी दोन्ही कामे अत्यंत कष्टाने ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केली. त्या वडार समाजाच्या घराचा, शिक्षणाचा आणि माणूस म्हणून जगण्याचा साधा प्रश्नदेखील या स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या राज्यकर्त्यांनी सोडविला नाही. तेव्हा त्यांची परिस्थिती आजही बदललेली दिसत नाही. याउलट आता तर त्यांच्या हातातील हा व्यवसायही नव्या तंत्रज्ञानाने काढून घेतल्याने त्यांची फार मोठी पिछेहाट झाली आहे. समाजकारणात आणि राजकारणात हा समाज म्हणावा तसा लोकसंख्येच्या दृष्टीने प्रभाव टाकू शकलेला नाही; परंतु हाच वडार समाज महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या कर्नाटक, आंध्रामध्ये अनुसूचित जातींमध्ये गेल्याने त्यांचा राजकारणावर चांगला प्रभाव आहे. महाराष्ट्रात मात्र वडार समाजाचे जीवन अंधकारमय आहे. वडार समाजाच्या जीवनाविषयी, त्यांच्या चालीरीती, संस्कृतीविषयी लोकांना फार काही माहितीही नाही. तेव्हा या वडार समाजाची ही संपूर्ण माहिती, त्यांची जीवनपद्धती साहित्यात आली पाहिजे या दृष्टीने या कादंबरीचे लेखन झालेले आहे.
वडार समाजातील ऐकण्यात आलेल्या अनेक प्रसंगांना साहित्याच्या रूपाने या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीच्या निमित्ताने वडार समाजाच्या विविध प्रश्नांच्या, तसेच त्यांच्या जीवघेण्या जगण्याच्या दृष्टीने वाचक अधिक गंभीर होतील असे लेखकाला वाटते.
Reviews
There are no reviews yet.