fbpx

Aapla Aahar Aaple Aushadh | आपला आहार आपले औषध

₹50

48Pages
AUTHOR :- Asha Bhand
ISBN :- 9789352201143

Share On :

Description

आपले शरीर ही एक स्वयंचलित परिपूर्ण कलाकृती आहे. ती निसर्गाची अमूल्य देणगी आहे. निसर्गाचे नियम आहेत. या निसर्गनियमात कधीच बदल होत नाहीत. त्यामुळे सूर्य ठरलेल्या वेळी उगवतो, मावळतो, दिवसरात्र होते. ऊन, पाऊस, थंडी पडते आणि बर्फ तयार होतो. वनस्पतींना फुले-फळे येतात. सूर्याच्या उष्णतेपासून वनस्पतींचे अन्न तयार होते. फळात जीवनशक्ती तयार होते. _असेच नियम शरीरासाठीही आहेत. शरीराचे इंधन अन्न आहे. हवा-पाणी आहे. अन्नातून ऊर्जा मिळते. शंभर वर्षं शरीराची क्षमता आहे. यंत्र नीट चालावे म्हणून योग्य इंधन वापरले नाही की यंत्र बिघडते. चुकीचा आहार घेतला की शरीरात बिघाड होतो. बिघाड म्हणजे आजारी पडणे. __ योग्य आहार घेतल्यास आजार होत नाहीत. म्हणजे आपला आहार हेच आपले औषध आहे. तळलेले, खूप शिजवलेले आणि मसाल्याच्या पदार्थाने शरीरास अपायच होतो. मांसाहार, कांदा, लसूण, मिरची, वांगी, चहा, कॉफी, सिगारेट आणि तंबाखूने शरीराची हानी होते.
शाकाहार, कच्च्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फळे हा अमृत आहार आहे. हेच आपले उत्तम औषधही आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aapla Aahar Aaple Aushadh | आपला आहार आपले औषध”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat