Badalatya Vishwarachanet Vedh Vikasit Bharatacha

₹248

376 Pages
AUTHOR :- Dr. Shailendra Devlankar
ISBN :- ‎ 978-9352209217

Share On :

Description

परराष्ट्र धोरण या विषयाशी सामान्य माणसाचा काय संबंध असं बहुतेकांना वाटत असतं. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ अशी एक जीवशास्त्रीय संज्ञा आहे; त्यानुसार कुठेतरी भूमध्यसागरी प्रदेशात एखाद्या फुलपाखराने आपले पंख फडफडवले की, पर्यावरणावर त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. परराष्ट्र धोरण हा विषय अगदी असाच आहे. दूरवर दिल्लीत बसून सरकार जी ध्येयधोरणे ठरवतं त्याचा परिणाम गल्लीत राहणार्‍या माणसांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होतच असतो.
शीतयुद्धोत्तर काळात जगाच्या पटलावर नव्या आर्थिक व राजकीय महासत्ता उदयास येत आहेत. जागतिक आणि ऐतिहासिक अंतर्वळणे बदलून टाकणार्‍या घटना जगभरात घडत आहेत. या सगळ्यांत भारत कुठे आहे? आज ‘विश्वबंधू’ म्हणून आपलं परराष्ट्र धोरण राबवणारा भारत महासत्ता बनू शकेल का? जागतिक दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, तेलाचे राजकारण आणि विकसित भारताची बलस्थाने आणि आव्हाने या सगळ्यांचा ताळेबंद एका तज्ज्ञाच्या लेखणीतून.
भारताचे पूर्वीचे व आजचे परराष्ट्र धोरण, त्या अनुषंगाने भारताचा आर्थिक व सांस्कृतिक राजनय, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी या सगळ्यांचा ऊहापोह प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या पुस्तकात आपल्या अभ्यासपूर्ण आणि विश्लेषक शैलीत केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याची लवकरच शतकपूर्ती होईल. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपण विकसनशील भारताला विकसित भारत बनविण्याचं व्यापक उद्दिष्ट ठेवलं आहे. महाराष्ट्रदेखील विकसित राज्य होण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करतो आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण कोणत्या क्षेत्रांत आमूलाग्र बदल करण्याची आणि त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे हे प्रामुख्याने डॉ. देवळाणकर आपल्याला सांगतात.
विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांचे अभ्यासक, पत्रकार, प्राध्यापक आणि हा विषय समजून घेण्यास उत्सुक असणार्‍या प्रत्येक नागरिकाला हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Badalatya Vishwarachanet Vedh Vikasit Bharatacha”

Your email address will not be published. Required fields are marked *