fbpx

Dr. A.P.J. Abdul Kalam | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

₹150

112 Pages

AUTHOR :- Srijan Pal Singh
ISBN :- ‎ 9789352203291
Order On WhatsApp

Share On :

Description

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ तर होतेच; पण भारताचे राष्ट्रपती, शिक्षक व मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही ते अतिशय लोकप्रिय होते. आपली उक्ती आणि कृती या दोन्हींच्या माध्यमांतून त्यांनी मनामनात स्वतःचे विशेष असे स्थान निर्माण केले. भारतामध्ये लोकांचा इतका स्नेह व आदर मिळवणार्‍या त्यांच्यासारख्या अगदी मोजक्याच व्यक्ती असतील.
हे पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली आहे. यात त्यांच्या बालपणीचे व तरुणपणीचे, फारसे परिचित नसलेले अनेक रंजक तसेच प्रेरणादायी प्रसंग वाचायला मिळतील, ज्यांतून कलामांच्या महान व्यक्तित्वाची जडणघडण झाली.
या पुस्तकात वापरण्यात आलेल्या चित्रांच्या माध्यमातून वाचक त्यांच्या जीवनकार्याचा चैतन्यदायी अनुभव घेऊ शकतील. पुस्तकात गुंफण्यात आलेले त्यांच्या आयुष्यातील हे प्रसंग म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोतच होय.

Additional information

About the Author

सृजनपाल सिंह यांनी अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून आदर्श विद्यार्थी म्हणून सुवर्णपदक पटकावले. नक्षलप्रभावी क्षेत्रामध्ये पारदर्शक अशी सार्वजनिक वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रू्रप’च्या (बीसीजी) माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केला. स्वित्झर्लंडमध्ये आयोजित केलेल्या ‘सेंट गॅलेन सिम्पोझियम’मध्ये त्यांना ‘ग्लोबल लीडर्स ऑफ टुमारो’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
त्यांनी भारतातील ग्रामीण जीवन अगदी जवळून अनुभवले असून विकास प्रणालीच्या अध्ययन व संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांत सातत्याने सहभाग नोंदवला आहे. विविध वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांमध्ये ‘विकसनशीलतेचा दृष्टिकोन’ या विषयावर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dr. A.P.J. Abdul Kalam | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat