fbpx

Intraday Trading | इंट्राडे ट्रेडिंग

₹200

176 Pages

AUTHOR :- Indrazith Shantharaj
ISBN :- ‎ 9789352203741

Share On :

Description

बहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर ‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील.
खरोखरच जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते. एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते. त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे. त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.
तेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!

Additional information

About Author

इंद्रजिथ शांथराज हे पूर्णवेळ ट्रेडर, सर्वाधिक खप असणार्या पुस्तकांचे लेखक आणि 10 वर्षांचा अनुभव असलेले माजी आयटी प्रोफेशनल आहेत. ते स्टॉक मार्केटमध्ये पूर्णवेळ करिअर करत आहेत, कारण तो त्यांच्या आवडीचा आणि कौशल्याचा विषय आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये यश मिळवल्यानंतर बहुतेकांना या कठीण वाटणार्या विषयात यशाचा मार्ग दाखवण्याची त्यांची इच्छा आहे.
ट्रेडिंगव्यतिरिक्त प्रवास करणे, वाचन आणि आध्यात्मिक साधना हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांचे लेख http://www.profiletraders.in या वेबसाइटवर वाचता येऊ शकतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Intraday Trading | इंट्राडे ट्रेडिंग”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat