fbpx

Bahujansamajatil Karmavir | बहुजनसमाजातील कर्मवीर

₹140

120Pages
AUTHOR :- Dattatray Sakharam Darekar
ISBN :- 9789352200832

Share On :

Description

समाजाच्या बांधणी-उभारणीत अनेक समाजपुरुषांचा वाटा असतो.
हे समाजपुरुष समाजातील सर्व घटकांच्या प्रगती अन् उन्नतीसाठी आयुष्यभर झटत असतात.
महाराष्ट्रातील बहुजनसमाज हा असाच शिक्षण, सामाजिक सुधारणा अन् प्रगतीत इतरांसोबत यावा म्हणून काही कर्मवीरांनी आपापल्या क्षेत्रात गेल्या शतकात अभूतपूर्व योगदान दिले आहे.
अशा काही कर्मवीरांचे सत्तर वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले हे चरित्र.
या कर्मवीरांनी बहुजनसमाजातील गरिबांना शिकविण्याचा प्रयत्न केला, सामाजिक सुधारणांसाठी प्रबोधन केले, वर्तमानपत्रांद्वारे अन् आपल्या लेखनातून समाजजागृतीचा आयुष्यभर ध्यास घेतला.
दत्तात्रय सखाराम दरेकर यांनी सत्तर वर्षांपूर्वी प्रकाशनाची साधनं हाती नसताना, बहुजनसमाजातील या कर्मवीरांच्या कार्याची ओळख महाराष्ट्राला करून दिली. हे फार मोठे सामाजिक जबाबदारीचे काम आहे.
वंचित समाजाचे प्रबोधन करत त्यांच्या शिक्षणासाठी झटलेले महात्मा जोतिबा फुले, गोरगरिबांनी शिकलं पाहिजे म्हणणारे गंगाराम भाऊ म्हस्के, आयुष्यभराची सगळी पुंजी समाजातील गरीब गरजूंना देणारे बडोद्यातील दिवाण रामचंद्र धामणस्कर, अस्पृश्योद्धाराचे पर्वताएवढे कार्य करणारे महर्षी वि.रा.शिंदे, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ज्ञानपोही सुरू करणारे कर्मवीर भाऊराव, जेधे बंधू, बापूराव जगताप, श्यामराव देसाई ही सगळी माणसं बहुजनसमाजातील दीपस्तंभ आहेत.
त्यांची ओळख समाजाला करून देण्याचे काम लेखक दत्तात्रय दरेकरांनी केले आहे. अशाच कर्मवीरांच्या कार्यामुळे समाजाची जडणघडण होत असते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bahujansamajatil Karmavir | बहुजनसमाजातील कर्मवीर”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat