Description
भाषणं अनेक जण करतात, ती अनेक प्रकारची असतात. भाषणाची मार्गदर्शन करणारी पुस्तकेही अनेक आहेंत; परंतु ‘बोला आणि मोठे व्हा!’ हे वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे. हे पुस्तक केवळ सभेतल्या भाषणांसाठी नसून, दैनंदिन जीवनातील बोलणं, परस्पर संवाद अशा अनेकविध गोष्टींचा इथे मुद्दाम विचार केला आहे. बोलका माणूस जीवनात अधिक यशस्वी होतो, हे सूत्र या पुस्तकामागे आहे. जीवनात पदोपदी बोलण्याचं महत्त्व आपल्याला जाणवतं. अनोळख्या ठिकाणी गेलो की प्रथम बोलणं कसं सुरू करावं, काय बोलावं, मुलाखतीत कसं बोलावं, वरिष्ठांकडं गेलो असता कसं बोलावं, असे प्रश्न निर्माण होतात. अशा सगळ्या गोष्टींचा विचार ‘बोला आणि मोठे व्हा!’ या पुस्तकात केला आहे. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. |
Reviews
There are no reviews yet.