Description
डॉ. आंबेडकरांचे काही इतस्तत: विखुरलेले अनुभव आणि त्यांचे सहकारी व निकटवर्तीय यांच्या आठवणी येथे एकत्र केल्या आहेत. बुद्धिमान, कष्टाळू आणि संवेदनशील अशा डॉ. आंबेडकरांच्या वाटेत पूर्वग्रहांची अभेद्य व चिरेबंद भिंत कशी आडवी आली होती आणि तिने त्यांचे जीवनकार्यच कसे संकटात आणले होते हे वाचकाला येथे दिसेल. समजूतदार आस्थेवाईकपणे टिपलेल्या त्यांच्या सशक्त व चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या खुणा त्याला येथे आढळतील. त्यांचे धवल चरित्र आणि उज्ज्वल यश पाहून प्रशंसेची दाद त्याला द्यावीशी वाटेल. ते त्यांच्या काळातील सर्वांत लक्षणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे अल्पज्ञात पैलू, चारित्र्य आणि तत्कालीन गुंतागुंतीची परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकल्यामुळे हा एक अमूल्य ग्रंथ झाला आहे. पुढेही तो तसाच राहील.
Reviews
There are no reviews yet.