Description
मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी. माणूस ते महात्मा. पोरबंदरमध्ये जन्मून जगभरात पोचलेल्या एका माणसाचा या दोन संबोधनांदरम्यान झालेला प्रवास केवळ अद्भुत म्हणावा असा. विशेष हे की, तो त्यांचा एकट्याचा प्रवास नव्हता. तो त्यांच्यासोबत असंख्य जनसामान्यांचा, भोवतालचा आणि काळाचा प्रवास होता. या प्रवासाचं रूप, वेग, उंची, खोली, सगळंच मोहवून टाकणारं. त्यांच्या चाहत्यांसह त्यांच्या विरोधकांवरही पडलेली ही मोहिनी नक्की कशाची आहे? तब्बल दीडशे वर्षांनी, आजच्या वेगानं बदललेल्या, आधुनिक म्हणवणाऱ्या काळात या प्रश्नाचं उत्तर शोधलंच पाहिजे. ‘महात्मा गांधी’ हे केवळ एका माणसाचं नाही, तर भारतीय मातीत बेमालूमपणे मिसळून गेलेल्या ‘फेनॉमेनॉ’चं नाव आहे, या नम्र जाणिवेतून त्यांच्या विराट रूपाचे कवडसे पकडणं दिवसेंदिवस गरजेचं बनत आहे.
Reviews
There are no reviews yet.