Description
पुन्हा कधीही शब्दांची कमतरता भासू देऊ नका!
तुम्हाला कधी अशा यशस्वी लोकांचे कौतुक वाटले आहे का, ज्यांचे आयुष्य अगदी सुफळ-संपन्न आहे असे वाटते? तुम्ही अशा लोकांना पार्ट्यांमध्ये व बिझनेस मीटिंग्जमध्ये आत्मविश्वासाने बोलताना पाहता. अशा लोकांकडे सर्वोत्तम नोकर्या, उत्तम जोडीदार व चांगले मित्र असतात.
हे लोक काही तुमच्यापेक्षा जास्त हुशार किंवा दिसायला अधिक देखणे असतात असे नाही. मग त्यांच्या यशाचे रहस्य काय असते? त्यांच्याकडे लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य असते.
‘हाउ टू टॉक टू एनीवन’ या बेस्टसेलिंग पुस्तकात जागतिक स्तरावरील अव्वल लेखिका आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लाइफ कोच लायल लाउंड्स यांनी यशस्वी संवादाची रहस्ये आणि मानसशास्त्र उलगडले आहे. या साध्यासोप्या व प्रभावी अशा 92 तंत्रांद्वारे तुम्ही पुढील कौशल्ये आत्मसात करू शकता :
एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे पार्टीवर पकड कशी मिळवावी?
कोणत्याही समूहात आतल्या गोटातील व्यक्ती कसे व्हावे?
संवादाला सुयोग्य दिशा देण्यासाठी शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा वापर कसा करावा?
समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा?
या पुस्तकाचा सुबोध व ओघवता मराठी अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी. कोणत्याही प्रसंगी यशस्वी संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करणारे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.