fbpx

Ikigai | Positive Thinking

₹425

352 Pages
AUTHOR :- Ken Mogi, Norman Vincent Peale
ISBN :- 978-9352205684

Share On :

Description

‘इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’
‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’

– द टाइम्स
हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पक आणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या : कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…
तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…
तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…

तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातील केन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल.

———————————————————————————————————————–

प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून योग्य पाऊल टाका.
आपल्या रोजच्या कामकाजात भरभरून उत्साह व आनंद मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणारी ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने दिवसाची सुरुवात करा.
तुमच्या जीवनात उद्देशांची भर पडली पाहिजे.
तुमच्यामध्ये उत्साह आणि भक्कम आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी डॉ. पील यांनी साध्या; परंतु प्रभावी सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार वागल्यास तुमच्यात इच्छाशक्ती वाढेल आणि तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल.
नियोजनाचा आराखडा थोडक्यात; पण परिणामकारक असावा
ज्यांचा परिणाम कायम राहू शकेल अशा गोष्टी, घटना विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामळे मनातील शंकांचे निरसन होईल आणि भय निघून जाईल. त्यामुळेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उज्ज्वल होईल.
विजयी भव, यशस्वी भव!
तुम्ही जशी इच्छा कराल तसे होऊ शकाल. विजेता होणारा खेळाडू खेळ उत्कृष्टच खेळत असतो. तो जसा आज खेळतो तसाच उद्या खेळतो आणि त्यानंतरही तो तसाच खेळत असतो. आपणही आपले आयुष्य त्याच पद्धतीने जगायला हवे, असा विचार मनावर बिंबवला तर तुमच्या जीवनाला नवा उद्देश प्राप्त होईल. तुमच्यात तेवढी शक्ती आणि ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही विजेत्या खेळाडूसारखे जीवन जगू शकाल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ikigai | Positive Thinking”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat