Description
कुणाचे तरी गुलाम बनून राहणे ही आपली वृत्ती आहे.
गुलामाला विचार करायची अक्कल तर नसतेच; पण ‘का?’ असा प्रश्न विचारायची सोयही नसते.
विवेकशून्य स्वातंत्र्य आणि आत्महत्या यांत काहीही फरक नाही. विवेकी माणसाला कुणाचे ऐकायचे हे माहीत तर असतेच; पण एकदा ठरवल्यावर परिणामांची जबाबदारी तो आपलीच आहे असे मानतो आणि तसेच वर्तन करतो; याउलट गुलामाचे वर्तन असते.
हे नको असेल तर आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण कुणाकुणाचे आणि कसे गुलाम झालो आहोत, हे आपण समजून घेण्याची सुरुवात करायला हवी म्हणजे स्वतंत्र होण्याची वाट आपल्याला दिसेल.
डॉ. राजीव चिंतामण शारंगपाणी
एम्.एस्.(जनरल सर्जरी) डिप्लोमा स्पोर्ट्स मेडिसीन (कलोन, जर्मनी).
एकोणचाळीस वर्षांहून अधिक काळ योगासनांचा आणि वजन उचलण्याच्या व्यायामांचा अभ्यास.
अभिनेत्यांसाठी आणि नर्तकांसाठी अनेक कार्यशाळा.
भारतात तसेच अमेरिका, जर्मनी येथील अनेक प्रमुख शहरांत व्याख्याने.
भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी काम तसेच दूरदर्शनवरील माहितीपटांसाठी साहाय्य.
विविध माध्यमांतून लेखन, मुलाखती व व्याख्याने यांद्वारे जनजागृती.







Reviews
There are no reviews yet.