fbpx
Free Call

Jeff Bezos

₹ 250
224 Pages

AUTHOR :- Sudhir Sevekar
ISBN :- 9789352203437

Category: Product ID: 3956

Description

स्मार्टफोनवर केलेल्या एका क्लिकसरशी घरबसल्या हवी ती वस्तू खरेदी करता येऊ शकेल याचा आपण कधी स्वप्नात तरी विचार केला होता का? अर्थातच नाही… पण द्रष्ट्या जेफने हेच स्वप्न उराशी बाळगून १९९४ मध्ये ई कॉमर्स व्यवसायात पदार्पण केलं.
त्यावेळी वार्षिक २३०० टक्क्यांहून अधिक वेगानं वाढणारं इंटरनेट हेच जगाचं भविष्य असणार आहे हे अचूक ओळखणारी जेफ ही जेमतेम २५ वर्षांहून कमी कालावधीत पृथ्वीतलावरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरली.
हवं तेव्हा Amazon च्या व्हर्चुअल ट्रॉलीत पाहिजे ती वस्तू टाकणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील कुणाही व्यक्तीसाठी आता जेफ हे नाव अनोळखी नाही.
याच नावानं किंडल. Alexa अशा असंख्य नवीन शब्दांना जागतिक शब्दकोशात मानाचं स्थान मिळवून दिलं. आपल्या द्रष्ट्या कामगिरीने पृथ्वीवर राज्य करणारा जेफ सध्या ‘ब्लू ओरिजिन’ या आपल्या महत्त्वाकांक्षी कंपनीद्वारे अंतराळ पर्यटनाचं स्वप्न मानवी कवेत घेऊ पाहतोय. त्याशिवाय संपूर्ण मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या कित्येक नवनवीन गोष्टींवर त्याचं सातत्यानं काम सुरू आहे.
Amazon च्या झंझावाती वाटचालीची कहाणी सांगणारं हे पुस्तक जेफ बेझोसच्या व्यक्तिमत्त्वाचे असे कित्येक पैलू सविस्तरपणे मांडतंच; पण त्याचबरोबर त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ग्राहकाकडे पाहण्याची नवी दृष्टीही प्रदान करतं.

Additional information

About Author

सुधीर राधाकृष्ण सेवेकर
बी.एस्सी., एम.बी.ए. (मार्केटिंग) – प्रथमश्रेणी, बी.जे. – प्रथमश्रेणी, एम.एम.सी.जे. – (मास्टर इन जर्नालिझम अॅण्ड मासकम्युनिकेशन) – विद्यापीठात सर्वप्रथम. नाट्यशास प्रमाणपत्र अभ्यासक्रम – प्रथमश्रेणी लेखन आणि पत्रकारिता : • गेली चाळीस वर्षे दै. मराठवाडा, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सकाळ, इत्यादी वर्तमानपत्रांतून नियमित आणि विपुल लेखन. • कृषिपत्रकारितेसाठी – बळीराजा कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा) आणि पूर्वकृषिदूत कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा). • उद्योजकीय आणि पर्यटन पत्रकारितेसाठी चौथास्तंभ पुरस्कार. • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी पत्रकारिता विषयांच्या एम. ए. स्तरावरील चार क्रमिक पुस्तकांचे लेखन. • 'उद्योजक मासिकाचे संपादकीय सल्लागार. अनेक दिवाळी अंकांना पुरस्कार. • साकेत प्रकाशनातर्फे सात पुस्तके प्रकाशित. यातील रतन टाटा, बिल गेट्स, देहबोली, जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा या पुस्तकांना मराठीतील 'बेस्ट सेलर' म्हणून बहुमान. रंगभूमी व नाट्यविषयक उपक्रम : • विद्यापीठ युवक महोत्सव, एकांकिका स्पर्धा, कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा आदितून सहभाग. बाराहून अधिक मराठी-हिंदी/उर्दू नाटकांतून सहभाग. प्रशस्तिपत्रे. • अनेक नाट्यस्पर्धात्त परीक्षक म्हणून काम आणि कामगार कल्याणच्या नाट्यशिबिरातून मार्गदर्शन. • प्रख्यात रंगकर्मी विजय तेंडुलकर, सदाशिव अमरापूरकर, कमलाकर सोनटक्के, अमोल पालेकर, सिनेदिग्दर्शक राजदत्त व इतर अनेक मान्यवरांच्या आकाशवाणी व दिवाळी अंकांसाठी मुलाखती. • नाट्यशास्त्र विषयाचा अभ्यागत व्याख्याता म्हणून कार्य. • गेली अनेक वर्षे कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची नाटके यांविषयी सकाळ, दिव्य मराठी व अन्य वृत्तपत्रांतून नियमित नाट्यसमीक्षा लेखन. • आकाशवाणी'साठी अनेक श्रुतिकांचे लेखन-सादरीकरण. युवावाणी, अमृतधारा, कामगारजगत अशा विविध कार्यक्रमांतून कलावंत, लेखक आणि तज्जा म्हणून सहभाग. 'ज्ञानवाणी'च्या अनेक कार्यक्रमांतून सहभाग. • अनेक नाट्यसंमेलनांना हजेरी व परिसंवादातून सहभाग. चित्रपट व अन्य माध्यमे : • फिल्म इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या फिल्म अप्रिसिएशन' या अभ्यासक्रमासाठी निवड व तो यशस्वीरीत्या पूर्ण. • प्रभात फिल्म सोसायटी आणि आशय फिल्मक्लब पुणे यांच्या 'चित्रपट रसास्वाद' शिबिरातून अनेकदा सहभाग व मार्गदर्शन. •चित्रपटविषयक वृत्तपत्रीय स्तंभलेखन. अनेक दिवाळी अंकांतून चित्रपटविषयक अभ्यासपूर्ण आणि पुरस्कारप्राप्त लेख प्रसिद्ध. • 'सकाळ' दैनिकासाठी 'चित्ररंग' आणि 'सिनेमा मनातला' या स्तंभांचे दोन वर्षे लेखन. • दूरदर्शनच्या 'युवकदर्शन', 'आमची माती-आमची माणसं' या कार्यक्रमातून सहभाग. • झी टीव्ही, साम टीव्ही व अन्य वाहिन्यांच्या चर्चात्मक कार्यक्रमात सहभाग. • फिल्म जर्नालिझम, टीव्ही जर्नालिझम या अभ्यासक्रमांचे व्याख्याता. • विद्यापीठ स्तरावरील चित्रपटविषयक अनेक परिसंवाद, चर्चासत्रे यातून अभ्यासपूर्ण सहभाग. अभ्यासेतर उपक्रम : • NC.C. 'ए' प्रमाणपत्र (ज्युनिअर डिव्हिजन) उत्तीर्ण. • N.C.C. 'बी' प्रमाणपत्र (सीनिअर डिव्हिजन) उत्तीर्ण • N.C.C. वार्षिक शिबीर, गिर्यारोहण प्रशिक्षण शिबीर; तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून सहभाग. नोकरीविषयक : • पारले बेवरेजेस मुंबई, हस्ती पाईप मुंबई, बजाज ऑटो लिमिटेड, सेमिनीस व्हेजिटेबल सीड्स, नाथ सीड्स अशा प्रख्यात कंपन्यांतून वरिष्ठ पदावर काम. आता सेवानिवृत्त. • मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती या भाषा उत्तम अवगत. • अभ्यागत प्राध्यापक म्हणून एमबीए, सी.ए., जर्नालिझमसाठी आजही विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यातून सक्रिय. • 'उद्योजकता' या विषयाच्या महाविद्यालयीन क्रमिक पुस्तकांचे लेखक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jeff Bezos”

Your email address will not be published. Required fields are marked *