Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha | सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा

₹300

288Pages
AUTHOR :- Ramesh Patange
ISBN :- 9789352201471

Share On :

Description

दक्षिण आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरिया या देशांतील निवडक लोककथा या पुस्तकात आहेत. या सर्व देशांत भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपासून प्रसार झालेला आहे. या प्रदेशाला ‘बृहत् भारत’ असेही म्हणतात किंवा आजच्या भाषेत आपण त्याला ‘विस्तारित भारत’ असेही म्हणू शकतो. सर्व दक्षिण आशियातील देशांत भारतीय संस्कृती व भारतीय जीवनमूल्यांचा फार खोलवरचा प्रभाव आहे.
या सर्व देशांची लोकसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इथे लोककथांचे प्रचंड भांडार उपलब्ध आहे. या पुस्तकात प्रत्येक देशाच्या दहा कथा निवडताना ज्या कथांतून भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडेल अशा कथा निवडल्या आहेत. या कथांतून भावासाठी बलिदान देणारी बहीण, आईची रक्षा करणारा वाघ, एकनिष्ठ पत्नी, एकनिष्ठ पती, कर्तव्यदक्ष राजा, गुंतागुंतीच्या प्रकरणात न्याय करणारा न्यायाधीश, मधाच्या एका थेंबासाठी राज्य कसे गेले, अशा अनेक विषयांवरच्या कथा वाचायला मिळतात. यातील प्रत्येक कथा आपल्याला भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडवील आणि त्या देशांचे आपल्या देशाशी नाते आहे हे लक्षात येईल.
यातील कथा या सर्व देशांना भारतीयांशी जैविकरीत्या जोडणाऱ्या आहेत. हे सर्व देश म्हणजे आपल्या संस्कृतीचा विस्तार आहेत.

Click To Chat