Shaleya Vidyarthyansathi Utkrushta Bhashane | शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भाषणे

₹150

120 Pages
AUTHOR :- Aruna Kalaskar
ISBN :- 978-9352202997

Share On :

Description

विद्यार्थी मित्रहो, वक्तृत्व ही एक कला आहे. ती आत्मसात करण्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक असते. समूहापुढे उभं राहायचं कसं? आपण लिहिलेलं भाषण श्रोत्यांसमोर मांडावं कसं? आपण भाषण करताना काही विसरणार तर नाही ना? कारण समोर श्रोते पाहिल्यावर अनेकांची बोबडी वळते, बरं का! वक्तृत्व ही केवळ शब्दांचीच आतषबाजी नसते तर ती जीवनाची उपासना असते. ही उपासना निष्ठापूर्वकच करावी लागते. वक्त्याच्या ठायी शब्दशक्ती, विचारशक्ती, स्मरणशक्ती याचबरोबर एक अवधान शक्ती असली पाहिजे. प्रत्येक वक्त्याला स्वत:ची म्हणून एक शैली असावी लागते. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती व्यक्त होत असते. रियाजाने जसे गाणे जमते तसेच उत्तम वक्तृत्वदेखील साधनेतूनच आकाराला येते.
उत्तम वक्ता होण्याची इच्छा बाळगणार्यांनी प्रथम उत्तम श्रोता झाले पाहिजे, अनेकांना ऐकले पाहिजे. उत्तम वक्ता होण्यापूर्वी उत्तम वाचक झालं पाहिजे. म्हणूनच भाषणकला म्हणजेच वक्तृत्वकला अंगी कशी बाणवावी यासंबंधीचे विवेचन या पुस्तकातून केले आहे. यात मांडलेल्या विषयांचा उपयोग होऊन तुम्हीही आपले स्वतंत्र विचार मांडणारे ‘वक्ते’ निश्चितच व्हाल.

Additional information

About Author

लेखिका परिचय
नाव: सौ. अरुणा शिरीष कळसकर
शिक्षण: एम. ए., बी. एड.
नोकरी:
• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये 28 वर्षे अध्यापन कार्य.
• माध्यमिक शालान्त परीक्षा (इ.10 वी) हिंदी आणि मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम 17 वर्षें करीत होत्या.
• वर्ष 2008 मध्ये इ. 10वी मराठी विषयाच्या ‘स्मार्ट सिरीज गाइड गद्य विभागा’साठी लेखन.
• महाराष्ट्र मराठी अध्यापक शिक्षक संघ, सातारातर्फे शिक्षकांसाठी घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दोन वेळा बक्षिसे प्राप्त.
• पिंपरी चिंचवड म.न.पा. आंतरशालेय शिक्षक निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.
• विविध शाळांमधून इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयासंदर्भात मार्गदर्शनपर व्याख्याने.
• पिंपरी चिंचवड म.न.पा. शिक्षक पतपेढीच्या संचालकपदावर 2011 पासून नियुक्ती-उपाध्यक्षपद-2012-13
• ‘सकाळ’ वृत्तपत्रातून ललित, स्फुट लेखन प्रकाशित.
• टि.म.वि. पुणे इ. 9वी बहि:स्थ परीक्षा (मराठी) पेपर सेटिंग या क्षेत्रात 28 वर्षे कार्य.
पुरस्कार :
• आदर्श शिक्षक पुरस्कार : पुणे म.न.पा. 1999
• आदर्श शिक्षक पुरस्कार : शिवतेज क्रीडा व शिक्षक मंडळ 2005-06
• गुणवंत शिक्षक पुरस्कार : विशेष वेतनवाढ : 2008
• आदर्श शिक्षक पुरस्कार : पिंपरी चिंचवड म.न.पा. 2010
• निवृत्त माध्यमिक शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षकास दिला जाणारा ‘कमल गोविंद’ पुरस्कार 2010
• आदर्श शिक्षक पुरस्कार : संकेत कला – क्रीडा प्रतिष्ठान, पुणे 2014 – 15
• पुणे आकाशवाणी, विद्यावाणीसाठी कथा, श्रुतिका लेखन – सादरीकरण, विविध निबंध स्पर्धांमध्ये आजही सहभाग.
• सप्टेंबर 2015 मध्ये सेवानिवृत्त

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shaleya Vidyarthyansathi Utkrushta Bhashane | शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भाषणे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat