Description
आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा :
उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं.
चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं.
ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.
आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.
या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो.
माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो.
चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत.
ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत.
शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.








Reviews
There are no reviews yet.