fbpx

Ya Shodhanshivay Jeevan Ashakya | या शोधांशिवाय जीवन अशक्य

₹250

224Pages
AUTHOR :- Prabodh Chobe
ISBN :- 9789352201952

Share On :

Description

ज्या असंख्य लोकांच्या कामामुळे आजचे जग भौतिक सुखसोयींनी समृद्ध झाले त्या लोकांची चरित्रं व त्या शोधांचा इतिहास आपल्या बांधवांनी; विशेषत: विद्यार्थ्यांनी जर वाचला तर त्यांना काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळेल का? या विचारातून या पुस्तकाची निर्मिती झाली.
कोणताही उपदेश न करता आज आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या वस्तू जीवनातील एक भाग म्हणून सतत वापरतो त्यांच्या शोधांच्या कथा व रंजक इतिहास या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. निव्वळ परदेशी जाण्याचा ध्यास ठेवून आपली बुद्धी आणि शक्ती इतरांच्या कामी खर्च करण्यापेक्षा आपल्याच देशात बदल घडवता आला तर? या पुस्तकातल्या प्रत्येक शोधापासून आपण स्फूर्ती घेतली तर नक्कीच तसे होऊ शकेल!
यातला प्रत्येक शोध म्हणजे डझनावारी लोकांचे निदान शतकभराचे तरी प्रयत्न आहेत. हा टप्पा गाठणे म्हणजे काय? तर कल्पकता – कल्पकता आणि कल्पकता!!

Additional information

About Author

लेखक परिचय
• डॉ. प्रबोध चोबे हे एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ असून बी.ए.एस.एफ.चे
माजी संशोधन केंद्रप्रमुख होते. • पदवीचं शिक्षण पवई येथील आय.आय.टी.मधून संपन्न. • 'स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क' येधून ऑर्गेनोमेटलिक केमिस्ट्री
या विषयात डॉक्टरेट. 'नेहरू विज्ञान केंद्रा'च्या 'इनोव्हेशन हब'मध्ये प्रमुख मार्गदर्शक पदावर कार्य. २५ वर्षांहून जास्त काळ एका मोठ्या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीच्या संशोधन केंद्राची जबाबदारी. आपल्या लेखनातून व व्याख्यानांमधून कोणताही शास्त्रीय विषय मराठीमधून सहज समजेल अशा भाषेत, सोप्यात सोपा करून मांडणे हा आवडता छंद. आजवर ६ पुस्तकं तसेच विविध मराठी नियतकालिकांमधून ६०० हून अधिक लेख प्रसिद्ध. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणे, विज्ञानातील नवीन संशोधनाबद्दल त्यांचा उत्साह वाढविणे, देशासाठी भरीव संशोधन करायला त्यांना उद्युक्त करणे तसेच प्राध्यापकांना संशोधन विषयात मार्गदर्शन करणे अशा विविध उपक्रमांत अजूनही सतत सक्रिय सहभाग.
• रसायनशास्त्रातील आधुनिक विषयांवरील सखोल व्याख्याने लोकप्रिय. व्याख्यानांच्या निमित्ताने भारतभर अविरतपणे भ्रमण. शालेय जीवनात तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते प्रेसिडेंट्स
स्काउट' हा सर्वोच्च सन्मान राष्ट्रपती भवन येथे प्रदान. . 'भिंगाची करामत' या पुस्तकाला २०११ या वर्षी महाराष्ट्र शासनाचा
'उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती' पुरस्कार. • संगीताचीही मनस्वी आवड, गायनाच्या मोठमोठ्या स्पर्धांमधून तेरा
प्रथम पारितोषिके प्राप्त..

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ya Shodhanshivay Jeevan Ashakya | या शोधांशिवाय जीवन अशक्य”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat