fbpx

Albert Einstein | आल्बर्ट आईन्स्टाईन

₹250

200 Pages
AUTHOR :- Jaiprakash Zende
ISBN :- 978-9352203956

Share On :

Description

कर्तृत्वादाखल ज्यांचं नावही पुरेसं असतं अशा काही व्यक्तींच्या यादीत आपलं ध्रुवपद सर्वकाळ अढळपणे राखणारं नाव म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाइन!
शाळेतील एक तथाकथित सामान्य विद्यार्थी ते विज्ञानात अजोड योगदान देणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ असा त्यांचा जीवनप्रवास अत्यंत रोचक आहे. त्यांनी आपल्या कार्याद्वारे विज्ञान क्षेत्रात संशोधन करू पाहणार्या असंख्य नव्या संशोधकांसाठी भक्कम पाया तयार केला.
विज्ञानानं मानवी जीवनाला उन्नत करण्याचा उदात्त दृष्टिकोन ठेवावा असं आइन्स्टाइन म्हणत. सुखानं नांदणारं शांतताप्रिय जग या संकल्पनेवर त्यांचा ठाम विेशास होता.
अशा या महान शास्त्रज्ञाची जडणघडण, कौटुंबिक जीवन, संघर्षयात्रा, दुसर्या महायुद्धाचे त्यांनी सोसलेले परिणाम यावर हे पुस्तक प्रकाश टाकतं. तसेच त्यांचं भगीरथ कार्य, मानवतावादी दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव यांची मनोज्ञ सफर घडवतं.

Additional information

About Author

जयप्रकाश झेंडे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून टाटा मोटर्स या टाटा उद्योगसमूहातील अग्रगण्य कंपनीत तीस वर्षे काम केल्यानंतर ते वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले.
त्यांची आजवर बावीस पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक दैनिके आणि नियतकालिकांमधून त्यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होतात. यातील अनेक पुस्तके बेस्टसेलर ठरली आहेत.
सध्या ते औद्योगिक सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी विविध प्रथितयश संस्थांमधून सुमारे 1500 कार्यशाळांद्वारे 25000 अधिकारी तसेच कामगारांना प्रशिक्षण दिले आहे.
‘उमेद’ या एनजीओशीही ते संलग्न असून विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Albert Einstein | आल्बर्ट आईन्स्टाईन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat