fbpx

Jonathan Livingston Seagull | जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल

₹175

120Pages
AUTHOR :- Richard Bach
ISBN :- 9788177866254

Share On :

Description

नवी गोष्ट शिकणं आणि तिचा सराव करणं ही साधना आहे. साधनेत सातत्य हवे. सातत्याने सहजता येते. सहजतेतून पारंगतता मग जीवनाचे मुख्य मूल्य बनते.
आयुष्य हा एक प्रवास आहे. त्याचे अदृश्य परिपूर्ण तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आनंदाचा साक्षात्कार.
बहुतांशी समुद्रपक्ष्यांचं जगणं साधं सरळ असतं. दोन वेळेसच्या खाण्यासाठी धडपडणं, पोटाची खळगी भरणं म्हणजे जगणं नाही. छोट्या-मोठ्या कारणांसाठी आपसात भांडत राहणं, जिवंतपणाचं लक्षण नाही.
जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल इतरांसारखा सामान्य समुद्रपक्षी नव्हता. त्याच्यासाठी उडणं आनंदासाठी होतं. निर्दोष परिपूर्ण उडणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव. कामात पारंगतता आली की, मर्यादांच्या शृंखला गळून पडतात. याकरिता हवेत प्रचंड कष्ट, मेहनतीचा निरंतर ध्यास आणि आत्मबलाची साथ आणि हे सगळं घडतं फक्त कृतीच्या वर्तमान क्षणात; म्हणूनच प्रत्यक्ष वर्तमानाचा क्षणच महत्त्वाचा आहे. आवडीचं काम करणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. यातून हाती येतं अंतिम सत्य.
अज्ञानाची भीती दूर सारून नव्या गोष्टी शिकत गेलो की, जगणं सुंदर बनत जातं.
ही आहे एक दंतकथा. आपल्या दररोजच्या जगण्यातच आपलं ईप्सित शोधण्याचा मार्ग दाखविणारी गोष्ट. समुद्रपक्ष्यांचा कळप, त्यांचं उडणं. थव्यांचे रीतिरिवाज आणि कायदेकानून, इथं रूपक म्हणून आले आहेत. जर आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला, तर त्या क्षेत्रातल्या अत्युच्च शिखरावर पोहोचता येतं, हे जोनाथनच्या गोष्टीचं सार आहे.

Additional information

About Author

Richard Bach was a tactical fighter pilot, a motion picture stunt pilot, and flight instructor before becoming one of the world’s bestselling authors. His books include Illusions and Running from Safety.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jonathan Livingston Seagull | जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat