fbpx

Nobel Vijetya Mahila | नोबेल विजेत्या महिला

₹275

264Pages
AUTHOR :- Asharani Vhora
ISBN :- 9789352202416

Share On :

Description

इ.स. १९०१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येणारा ‘नोबेल पुरस्कार’ हा जगातील सर्वोच्च सन्मान होय. आतापर्यंत हा पुरस्कार जगातील जवळपास ९०४ प्रतिभाशाली व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्यापैकी स्त्रियांची संख्या ५१ आहे. यातील ३० स्त्रियांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
यशाचे सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिलांनी ध्यास व अविरत साधनेद्वारे मिळविलेल्या यशाचे रहस्य जाणून घेणे, त्यांचे काम समजून घेणे व त्यापासून प्रेरणा घेणे, ही आकांक्षा कुणाला असणार नाही? साहित्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि विश्वशांतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या या तेजस्विनींच्या कार्यकर्तृत्वाला हा ग्रंथरूपी मानाचा मुजरा!

Additional information

About Author

लेखिका परिचय
आशाराणी व्होरा
जन्म : ७ एप्रिल, १९२१
मृत्यू : २१ डिसेंबर, २००९
शिक्षण : एम. ए. (समाजशास्त्र), हिंदी प्रभाकर
श्रीमती आशाराणी व्होरा या हिंदीतील सुप्रसिद्ध लेखिका आहेत. सुमारे सात दशके देशातील अनेक प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन सातत्यानं प्रकाशित होत असे. त्यांनी कविता, कथा, निबंध, चरित्र इत्यादी विविध साहित्यप्रकारात लेखन केलं. महिलांची दशा व दिशा यांचा व्यावहारिक समाजशास्त्रीय अभ्यास आणि महिलांच्या समस्यांविषयी संशोधनात्मक लेखनकार्य हा त्यांच्या लेखनाचा मूळ गाभा.
आशाराणी व्होरा राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार, सन्मानांनी गौरविल्या गेल्या. सुमारे नव्वदपेक्षा जास्त पुस्तकांद्वारे त्यांनी वाचकांशी आपली नाळ जोडली. महिलांच्या यशाशी संबंधित अद्वितीय अशा पुस्तकांच्या मालिकेतीलच आणखी एक पुष्प असणारे हे पुस्तक, महत्त्वाकांक्षी तरुणींना निश्चितच आणखी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा देईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nobel Vijetya Mahila | नोबेल विजेत्या महिला”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat