Swarajyasankalpak Shahaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj : Vyavasthapan Guru ani Vyavasthapan Guru ani Vyuharachanakarस्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज | छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण चरित्र

₹575

420 Pages
AUTHOR :- Dr. Sanjay Gaikwad
AUTHOR :- Girish Jakhotiya
ISBN :- 9789371187053

Share On :

Description

शहाजी महाराज म्हणजे जाज्वल्य स्वाभिमान, पराक्रम आणि धोरणी नेतृत्वाचा एक अद्वितीय संगम होय. त्यांच्या कर्तृत्वाने मराठी मातीला आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. ज्या काळी पाशवी अत्याचारांविरुद्ध ‘ब्र’ काढायची हिंमत नव्हती त्या काळात त्यांनी तीन वेळेस स्वतंत्र राज्य निर्माण केले. ‘होय, आम्हीही राजे होऊ शकतो’, हा संदेश येथील माणसाला दिला. मराठी जनतेच्या मनात नवी उमेद निर्माण केली. या स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेने मराठी मनगटात ‘बळ’ आणि मराठी मनात ‘मूळ’ निर्माण केले. त्यांच्या संघर्षातून चेतविलेला हा ‘आत्मसन्मान’ म्हणजे मराठी इतिहासाचे सुवर्णपान होय.
शिवबांना घडवून पालकांच्या आदर्शातून संततीचे भविष्य घडते, हा आदर्श विचार त्यांनी घालून दिला. शहाजी महाराजांच्या जीवनाची ही कथा म्हणजे केवळ एका कुटुंबाची गाथा नव्हे, तर स्वराज्य निर्माण करणाऱ्या युगाची प्रेरणा आहे.
शहाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या धुक्यात झाकोळला गेला होता. डॉ. संजय गायकवाड लिखित ‘स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज’ हा ग्रंथ इतिहासाच्या विस्मृतीत गेलेल्या या महानायकाला प्रज्वलित करण्याचा एक निःस्पृह प्रयत्न आहे.
बाबा भांड
ज्येष्ठ साहित्यिक

शिवरायांची व्यूहनीती यशस्वी ठरली ती त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामुळे. आपल्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रूंना नामोहरम केले व स्वराज्याची घडी उत्तम बसविली. उत्तम व्यवस्थापनामध्ये व्यूहरचना व व्यवस्थापन यांचा परस्परांतील मेळ, प्रसंगनिष्ठ चतुराई, साहाय्यक संघ, प्रकल्पाची पूर्वतयारी, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तडीस नेण्यात येणारी कामे, किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे शिवरायांनी दाखवून दिले.
स्वतःजवळ कुठलीही पुरेशी साधनसामग्री नसताना, बाकीचे मराठा सरदार परकीयांसमोर नतमस्तक होत असताना नि सारा समाज संभ्रमित-गलितगात्र झालेला असताना शिवाजी महाराजांनी जे ‘कल्पक धाडस’ केले, त्या धाडसाच्या व्यूहरचना-प्रक्रिया आजच्या तरुणांना कळल्या पाहिजेत. आजच्या ‘कॉर्पोरेट जगता’चे नेतृत्व सुजाण तरुणांनी करावयाचे असेल, तर छत्रपतींच्या अनेक व्यूहनीतींचा साकल्याने विचार व अंगीकार करावा लागेल.
या पुस्तकात खालील मुद्द्यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे.
शिवरायांचे-
• नियोजन आणि व्यवस्थापन
• नेतृत्व आणि कार्यपद्धती
• अर्थशास्त्र आणि अर्थकारण
• दूरदृष्टिता आणि विचारसरणी
• आधुनिक धार्मिकता व कर्मयोग
• उत्तम चारित्र्याची कल्पना

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swarajyasankalpak Shahaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj : Vyavasthapan Guru ani Vyavasthapan Guru ani Vyuharachanakarस्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज | छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *