fbpx

Vishwatil Samarthyashali Striya | विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया

₹275

240Pages
AUTHOR :- Jyoti Dharmadhikari
ISBN :- 9789352202041

Share On :

Description

‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते’, हे आपण वर्षानुवर्षं वाचत आलो आणि ‘पुरुषामागे’ असण्यातच स्त्रियांनी धन्यताही मानली. पण आता स्त्री जर सक्षम असेल तर तिचे सामर्थ्य जगासमोर येण्यासाठी आणि ते जगालाव उपयुक्त ठरण्यासाठी पुरुषानेही तिच्या पाठीशी राहण्यास काहीच कमीपणा नाही तर मनाचा मोठेपणा आहे. हे लिखाण वाचून स्त्री-पुरुष समानतेचा आणि परस्पर सहकार्याचा अत्यंत आवश्यक असा नवा विचार नकळत मनात मूळ धरू लागतो.
आज एकविसाव्या शतकातही ‘बापघर आणि आपघर’ – ‘माहेर आणि सासर’ या पारंपारिक व्यवस्थेतच अजूनही बंदिस्त असणार्या किंवा स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेणार्या प्रत्येक स्त्रीला प्रेरक ठरेल, आत्मसन्मानाची जाणीव करून देईल, प्रयत्नांची नवी वाट शोधायला लावील असं हे पुस्तक आहे. आत्माविष्कार करताना कोणत्याही वयाच्या-वंशाच्या-क्षेत्रातील स्त्रीला या 11 स्त्रिया आधारस्तंभ वाटतील, प्रकाशवाट दाखवितील आणि यातच या पुस्तकाची सार्थकता दडलेली आहे, असं मला वाटतं.
– डॉ. रमा मराठे
M.D.,C.I.G., M.Sc., Ph.D. (Psychology)
डॉ. वंगारी मथाई । आंग सान स्यू ची । मलाला युसुफझाई डॉ. अँजेला मर्केल । डॉ. मेरी क्यूरी । मदर तेरेसा रोझा पार्क्स । इंदिरा गांधी । आयजेन पू ओपरा विनफ्रे । जेनेट मॉक

Additional information

About Author

डॉ. ज्योती धर्माधिकारी इंग्रजी विभागप्रमुख, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना.
० पदवी : बी. एस्सी. (फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स) ० पदव्युत्तर शिक्षण : एम.ए. (इंग्रजी), बी. एड., पीएच.डी. ० अध्यापनकार्याचा सव्वीस वर्षांचा अनुभव. हायस्कूल आणि कनिष्ठ
महाविद्यालयामधील अध्यापनानंतर १९९७ पासून पदवी
महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत. ० विद्यापरिषद सदस्य (इंग्रजी, पदव्युत्तर विभाग), डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. ० २०१७ यावर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या
नवलेखक अनुदानासाठी 'प्रिझम' या ललित-लेखसंग्रहाची निवड. ० 'प्रिझम' या ललित लेखसंग्रहाला 'आचार्य भानूकवी राज्यस्तरीय उत्कृष्ट
वाङ्मय पुरस्कार'. ० विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये सातत्याने वाङ्मय संशोधनपर लेखन. ० वृत्तपत्र आणि दिवाळी अंकांसाठी विपुल ललित लेखन, पुस्तक परीक्षण
आणि समीक्षण. ० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदांमध्ये संशोधन पत्रिकांचे वाचन.
विविध संकलित पुस्तकांमध्ये संशोधन पत्रिका समाविष्ट. ० मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा इंग्रजी जगताला परिचय करून
देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय इंग्रजी जर्नल्समध्ये सातत्याने लेखन. ० आकाशवाणी व साहित्य संमेलनामध्ये कथाकथन. ० अनेक कथा आणि कविता प्रसिद्ध.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vishwatil Samarthyashali Striya | विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat