About Author |
"डॉ. दत्तात्रय व्यंकटेश जहागीरदार
१९५८ मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.एससी.ची पदवी घेतल्यानंतर त्याच वर्षी शासकीय पदव्युत्तर महाविद्यालय रायपूर (म.प्र.) येथे अधिव्याख्याता म्हणून नेमणूक. १९६३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात व्याख्याते म्हणून नियुक्ती, तेथेच १९९७ मध्ये प्रोफेसर म्हणून निवृत्ती, चौदा विद्यार्थ्याना पी.एचडी. मार्गदर्शन, ९० संशोधनपत्रिका प्रसिद्ध. जार्जिया स्टेट युनि. अटलांटा व युनि. ऑफ डेलावेअर या अमेरिकेतील विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन, फिनलंड येथील टुर्के विद्यापीठात अतिथी प्राध्यापक, महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षक' हा बहुमान १९९६ मध्ये मिळाला.
विज्ञानकथा लेखक म्हणून लेखन दिवाळी अंकात, तसेच पुस्तके प्रसिद्ध, आतापर्यंत सहा विज्ञान कथासंग्रह प्रसिद्ध, शिवाय 'साकेत प्रकाशन'तर्फे मे २००७ ला 'स्टिफन हॉकिंग' व ऑगस्ट २००७ ला 'शाब्बास सुनीता' ही पुस्तके प्रकाशित, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्लीतर्फे एक रसायनशास्त्रावरील पुस्तक प्रसिद्ध, निवृत्तीचा काळ लेखन, वाचन व नातवंडांशी खेळणे, यात कसा गेला ते समजलेच नाही."
|
Reviews
There are no reviews yet.